(1 / 6)कॉफी किंवा कॅफिन युक्त या पेयाचे जास्त सेवन केल्यास डिहायड्रेशन होते. इतकंच नाही तर अतिरिक्त कॉफी प्यायल्याने निद्रानाश किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. कॉफी पिण्याच्या या दुष्परिणामांबद्दल ऐकून अनेक जण रात्री कॉफी पित नाहीत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर तुम्ही रात्री नियमितपणे कॉफी प्यायली तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.