मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Curry Leaves for Hair: केसांवर अशा प्रकारे वापरा कढीपत्ता, दूर होतील अनेक समस्या

Curry Leaves for Hair: केसांवर अशा प्रकारे वापरा कढीपत्ता, दूर होतील अनेक समस्या

Jun 28, 2024 07:31 PM IST
  • twitter
  • twitter
Hair Care With Curry Leaves: कढीपत्त्याचा वापर करून केस गळण्याची समस्या पूर्णपणे कमी करता येते. त्यासाठी कढीपत्ता कसा वापरावा ते जाणून घ्या.
केसांच्या विविध समस्येने अनेक जण त्रस्त असतात. धूळ, प्रदूषण, लोहाची कमतरता हे केस गळतीस कारणीभूत ठरतात. याशिवाय जेल, स्ट्रेटनर आदी विविध रसायनेही वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. परिणामी केस कमकुवत होतात. कोंड्याची समस्या, पांढरे केस, कोरडे केस इत्यादी समस्या वाढतच राहतात.
share
(1 / 6)

केसांच्या सर्व समस्येवर उपाय एका पानात दडलेला आहे तो म्हणजे कढीपत्ता. या कढीपत्त्याच्या पानामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. जाणून घ्या त्याचा वापर कसा करावा 
share
(2 / 6)

कढीपत्त्यात असलेले प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन केस गळती रोखतात. हे पान अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे केसांमधील ओलावा संरक्षित करतात आणि कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. 
share
(3 / 6)

हेअर टॉनिक म्हणून वापरा: खोबरेल तेलात कढीपत्ता घालून पाने काळी होईपर्यंत गरम करा. नंतर हे मिश्रण चांगले गाळून घ्या आणि याने टाळूवर चांगले मसाज करा. एक तास राहू द्या आणि नंतर शॅम्पूने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हे तेल लावा. केसांची वाढ होते. केस गळती कमी होते. 
share
(4 / 6)

हेअर मास्क म्हणून वापरा: कढीपत्ता बारीक करून घ्या. नंतर त्यात दही घाला. हे मिश्रण डोक्यावर लावून २० ते २५ मिनिटे ठेवा. केस शॅम्पूने धुवून टाका. केस दाट करण्यासाठी आठवड्यातून एकदा हा मास्क लावा. या हेअर पॅकमध्ये दह्याऐवजी कांद्याचा रसही घालू शकता. 
share
(5 / 6)

कढीपत्ता चहा: कढीपत्त्याचा चहा नियमित प्यायल्याने केसांच्या विविध प्रकारच्या समस्याही दूर होतात. कढीपत्ता पाच मिनिटे पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घालावे. आठवडाभर हा चहा ट्राय करा. या चहामुळे पचनशक्ती वाढते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केस पांढरे होण्यापासूनही बचाव होऊ शकतो. 
share
(6 / 6)

इतर गॅलरीज