बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसह क्रिती सेनॉन, परेश रावल, मनीषा कोईराला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेऊया..
क्रिती सेनॉन(Kriti Sanon): क्रिती सेनॉने या चित्रपटासाठी जवळपास ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे,
परेश रावल(Paresh Rawal): चित्रपटात परेश रावल यांनी कार्तिक आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांनी या भूमिकेसाठी दीड कोटी रुपये घेतले आहेत.
रोनित रॉय(Ronit Roy): चित्रपटात कार्तिकच्या खऱ्या वडिलांची भूमिका रोनित रॉयने साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने ७५ लाख रुपये घेतले.
मनीषा कोइराला(Manisha Koirala): मनीषा कोईरालाने चित्रपटातील कार्तिकच्या आईच्या भूमिकेसाठी एक कोटी रुपये फी घेतली आहे.