साई पल्लवी ही साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे तर,बॉलिवूडसह संपूर्ण मनोरंजन विश्वात खूप प्रसिद्ध आहे. साई पल्लवी आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘प्रेमम’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या पहिल्याच चित्रपटापासून साईने प्रेक्षकांच्या मनावर कब्जा केला. साई अभिनयासोबत तिच्या नॅचरल ब्युटीसाठीही फार प्रसिद्ध आहे.
साई पल्लवीची गोरी त्वचा आणि लांब केस नेहमीच चर्चेत असतात. साई अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने बिना मेकअप स्क्रीनवर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची त्वचा आणि केसांची काळजी कशी घेते हे जाणून घ्या.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांना इंस्टाग्रामवर उत्तरे दिली. तिच्या केस आणि स्किनकेअर रुटीनवरील प्रश्नाचे उत्तर देताना, सई पल्लवीने लिहिले, "तुम्हाला सर्व मूलभूत गोष्टी माहित असायला हव्यात. व्यायाम (आठवड्यातून किमान तीनदा), निरोगी खा, भरपूर फळे/भाज्या खा. माझ्या अनुभवांनुसार, हे उपयुक्त ठरेल. “आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या! हे तितकेच महत्वाचे आहे” असे साई म्हणाली.
योग्य खाणे आणि रोज व्यायाम करणे याकडे साई पल्लवी खूप लक्ष देते. साई पल्लवीने २०१९ मध्ये तिच्या एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला, "चित्रपटात माझ्या चेहऱ्यावर पुष्कळ पिंपल्स होते, पण लोकांनी मला मी जशी आहे तसे स्वीकारल आणि आत्मविश्वास हेच खरे सौंदर्य आहे हे मला कळले."