मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  KKR Victory celebration : आयपीएल जिंकल्यानंतर केकेआरचा जल्लोष, खेळाडूंसह गंभीर-शाहरूखनं असं केलं सेलिब्रेशन

KKR Victory celebration : आयपीएल जिंकल्यानंतर केकेआरचा जल्लोष, खेळाडूंसह गंभीर-शाहरूखनं असं केलं सेलिब्रेशन

May 27, 2024 10:53 AM IST
  • twitter
  • twitter
  • KKRs celebration IPL finals: आयपीएल 2024 अंतिम KKR: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन बनल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. केकेआरच्या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खानही सहभागी झाला होता.
कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. केकेआरच्या विजेतेपदानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.
share
(1 / 5)
कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. केकेआरच्या विजेतेपदानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.
केकेआरच्या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानही सहभागी झाले होते. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी शाहरुखचे संपूर्ण कुटुंब आले होते.
share
(2 / 5)
केकेआरच्या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानही सहभागी झाले होते. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी शाहरुखचे संपूर्ण कुटुंब आले होते.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकात्याच्या विजयानंतर खेळाडूंनी जोरदार डान्स केला. खेळाडूंसोबतच मार्गदर्शक गौतम गंभीरही खूप आनंदी दिसला.
share
(3 / 5)
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकात्याच्या विजयानंतर खेळाडूंनी जोरदार डान्स केला. खेळाडूंसोबतच मार्गदर्शक गौतम गंभीरही खूप आनंदी दिसला.(PTI)
सुनील नरेनने या मोसमात कोलकाताकडून दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८८ धावा केल्या. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. नरेनसह फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४३५ धावा केल्या. सॉल्टने ४ अर्धशतके झळकावली.
share
(4 / 5)

विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२  मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.
share
(5 / 5)
विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२  मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज