कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८१ धावांनी पराभव केला. यासह कोलकाता संघाने स्पर्धेतील पहिला विजय संपादन केला आहे.
(PTI)२०४ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर गारद झाला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या.
केकेआरच्या फिरकीपटूंनी ९ फलंदाजांची शिकार केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने ४ , सुयश शर्माने ३ आणि सुनील नरेनने दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने शार्दुल ठाकूरच्या ६८, रहमानउल्ला गुरबाजच्या ५७ आणि रिंकू सिंगच्या ४६ धावांच्या जोरावर २०४ धावा केल्या. रिंकू आणि शार्दुलमध्ये सहाव्या विकेटसाठी ४५ चेंडूत १०३ धावांची भागीदारी झाली. शार्दुलने २९ चेंडूत ६८ धावांची खेळी खेळली, ज्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याने २० चेंडूत अर्धशतक केले.