(1 / 5)आयपीएल 2023 च्या ३९व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाताने गुजरातला १८० धावांचे लक्ष्य दिले होते, जे गुजरातने १३ चेंडू राखून पूर्ण केले. गुजरातच्या विजयाचा हिरो विजय शंकर ठरला, त्याने २४ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली. (AFP)