kite festival in Pune kalbhairavnath temple : पुण्यातील श्री बहिरोबा देव ट्रस्टचे कसबा पेठेतील प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिरात पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या आणि रंगातील २०० पेक्षा अधिक पतंगांची मंदिरात सजावट करण्यात आली होती.
(1 / 6)
मकर संक्रांतीनिमित्त प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध रंगाच्या आणि विविध आकरातील पतंगांची सजावट करण्यात आली होती.
(2 / 6)
तब्बल २०० पेक्षा अधिक पतंगाची सजावट यावेळी करण्यात आली. रंगीबेरंगी पतंगांनी मंदिर परिसर खुलून गेला. संक्रांतीनिमित्त केलेली सजावट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
(3 / 6)
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
(4 / 6)
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
(5 / 6)
कसबा पेठ पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती असून याठिकाणी मुळा, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे.
(6 / 6)
गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित पतंग महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.