आता ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे, सकाळी थोडी थंडी पडत आहे, रात्री पंखा लावून झोपलो, तरी थंडी वाजत आहे. यामुळे बहुतांश लोकांनी घरात एअर कंडिशनर (एसी) चालवणे बंद केले आहे, काही घरातील एसी सर्व्हिस करून व्यवस्थित झाकून ठेवले आहे. लोक या ऋतूत फ्रिजमधील पाणी पिणेही बंद करतात, कारण हवामानातील बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या वाढते.
(freepik)अशा वेळी लोक फ्रिजचा वापर देखील कमी करतात. कधी कधी आपण फ्रिज चालू करतो आणि नंतर काही तासांसाठी बंद ठेवतो. मात्र, आता तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्ही हिवाळ्यातही मर्यादित तापमानात फ्रिज चालू ठेवू शकता.
या ऋतूत जर आपण आधीच बर्फ साठवणे किंवा पाण्याची बाटली फ्रिजमध्ये ठेवणे बंद केले असेल, तर आपण फ्रीज कमी तापमानावर सेट करू शकता.
कारण, बर्फ आणि थंड पाणी तयार करण्यासाठी रेफ्रिजरेटरचे तापमान बटण मिडीयम किंवा हायवर सेट करावे लागते. उन्हाळा आणि हिवाळ्यानुसार रेफ्रिजरेटरमध्ये तापमान सेट करण्याचा ही पर्याय आहे.
हिवाळ्यात तुम्हाला फक्त दूध, भाज्या, फळे आणि शिजवलेले अन्न ताजे राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे लागते, जेणेकरून तुमचा फ्रीज कमी तापमानातही काम करू शकतो, ज्यामुळे तुमचे वीज बिलही कमी होईल.
त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. असे केल्याने या तापमानात कोणतेही खाणे-पिणे वाया जाणार नाही आणि जास्त काळ ताजे राहील. तर, वीज बिलही कमी करण्यातही मदत होईल. हिवाळ्यात फ्रिज बंद करणे हा चांगला पर्याय नाही, यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो. याऐवजी फ्रीज कमी तापमानावर सेट करणे आणि त्याचा वापर सुरू ठेवणे चांगले.