मासे शिजवण्यापूर्वी सर्वात पहिले कापून आणि नंतर स्वच्छ धुवून घेतले जातात. ते शिजवण्यापूर्वी मीठ आणि हळद लावून काही काळ ठेवले जातात. खरं तर भारतात अशी परंपराच आहे. पाश्चात्य देशांमध्ये मासे साफ करुन मीठ आणि मिरपूड लावून ठेवले जाता. पण मासे हळद आणि मीठ लावून का ठेवले जातात? चला जाणून घेऊया.. .
भारतात जेवण बनवण्याची पद्धत ही इतर देशांपेक्षा वेगळी आहे. येथे स्वयंपाक करण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून केल्याजात. मग ते मांसाहारी जेवण बनवणे असो किंवा शाकाहारी असो. मासे साफ केल्यानंतर ते मीठ आणि हळद लावून ठेवले जातात. हळदीमुळे त्यामधील निर्जंतू मारले जातात तसेच मासे बराच वेळ ताजे राहतात.
हळदीचा वापर कच्च्या माशांना मॅरीनेट करण्यासाठी केला जातो कारण त्याच्या अँटीबैक्टीरियल गुणधर्मांमुळे. हे जंतू आणि संक्रमण नष्ट करते. मासे ताजे राहण्यासाठी पाण्यात मीठ आणि हळद टाकून देखील साफ केले जातात. हे सूक्ष्मजंतूंचे पुनरुत्पादन थांबवते.
माशांना मीठ आणि हळद घालून मॅरीनेट केल्याने प्रथिनांचे प्रमाण टिकून राहते. हे मासे ताजे ठेवते. तसेच त्याची चव वाढवते.