स्वयंपाक करताना अनेकदा गॅस सिलिंडर संपतो. त्यामुळए अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येपासून सुटका मिळणे शक्य आहे. सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे एक छोटीशी चाचणी आधीच सांगू शकते.
आपल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला कसे कळेल? त्यासाठी सिलिंडरचे वजन करण्याची गरज नाही. किंवा झटकण्याची गरज नाही. एक अतिशय सुरक्षित छोटी चाचणी आपल्याला किती गॅस शिल्लक आहे हे सांगेल.
ही चाचणी करण्यासाठी आपल्याला फक्त एका छोट्या गोष्टीची आवश्यकता आहे. टॉवेल किंवा टॉवेलच्या आकाराचे कापड. तुमच्या स्वयंपाकघरातील सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तुम्हाला समजेल. आता जाणून घ्या सोपा मार्ग.
गॅस फ्लेमचा रंग निळ्यावरून पिवळ्या रंगात बदलतो, याचा अर्थ गॅस संपत आहे, असे अनेकांना वाटते. पण हे इतकं अचूक असू शकत नाही. किंबहुना कापडची चाचणी त्यापेक्षा अधिक सोपी आणि अचूक असते. त्याच्यासाठी काय करायचं?
ते कापड भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेले कापड गॅस सिलिंडर भोवती गुंडाळावे. या स्थितीत १ मिनिट थांबा. आता सिलिंडरवरून कापड काढल्यास सिलिंडरचे काही भाग कोरडे तर काही भाग ओले असल्याचे दिसून येते.