kidney Health: किडनीचे आरोग्य खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी संतुलित आहार घेणे देखील तितकेट महत्त्वाचे असते. चला जाणून घेऊया किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
(1 / 6)
किडनी निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी संतुलित आहारात सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाज्या आहे. त्यामुळे तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही या पाच भाज्या तुमच्या आहारात ठेवू शकता.
(2 / 6)
जीवनसत्त्वे बी ६, बी ९, सी आणि व्हिटॅमिन के किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. ही सर्व जीवनसत्त्वे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात.
(3 / 6)
दररोज, रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने किडनीशी संबंधित समस्या दूर होतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ॲलिसिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
(4 / 6)
हिरव्या भाज्या किडनीसाठी खूप फायदेशीर असतात. पण या प्रकारची भाजी खाताना प्रमाण लक्षात ठेवावे, त्याचा अतिरेक कधीही होता कामा नये. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
(5 / 6)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोबी देखील खूप प्रभावी आहे. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, सोडियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ही सर्व जीवनसत्त्वे मूत्रपिंड निरोगी ठेवतात.
(6 / 6)
सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला तंदुरुस्त तर ठेवतातच पण किडनीही निरोगी ठेवतात. त्यात आढळणारे विरघळणारे फायबर ऍक्टिन रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते, जे किडनीसाठी चांगले आहे.