मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kiara Advani: कान्सच्या कार्पेटवर कियारा आडवाणीचा जलवा! पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय कमाल!

Kiara Advani: कान्सच्या कार्पेटवर कियारा आडवाणीचा जलवा! पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय कमाल!

May 18, 2024 02:01 PM IST Harshada Bhirvandekar

Kiara Advani Cannes Look: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनंतर आता अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा लूक कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनंतर आता अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा लूक कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये चर्चेत आला आहे. कियारा अडवाणी या वर्षी ‘कान्स २०२४’मध्ये रेड कार्पेटवर पदार्पण करत आहे आणि रेड कार्पेटपूर्वी मीडिया संवादासाठी रेडी झालेल्या कियाराने तिच्या लूकने सर्वांना प्रभावित केले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

कियाराच्या स्वच्छ फ्रेश लूकमुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे. याचा व्हिडीओ आणि फोटो कियाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कियारा अडवाणीने रेड कार्पेटवर येण्यापूर्वी तिच्या लूकची झलक दाखवली, ज्यामध्ये तिने व्हाईट सॅटिन गाऊन घातलेला दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

थाय हाय स्लिट आणि लो नेकलाइनसह वेस्टलाईनला डिटेल्स देणारा बेल्ट सॅटिन मॅचिंग फॅब्रिकपासून बनवला आहे. कियाराचा हा पोशाख खूप छान दिसतो आहे. तिच्या ड्रेसच्या मागच्या बाजूस ट्रेल देखील दिसत आहे. हा ड्रेस डिझायनर प्रबल गुरुंग यांच्या कलेक्शनमधून घेण्यात आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

कियारा अडवाणीने या हॉट आणि ग्लॅमरस सॅटिन ड्रेससोबत मोत्याचे झुमके घातले आहेत. या झुमक्यांच्या स्टेटमेंटची रचना पूर्णपणे वेगळी बनवली आहे. कियारा अडवाणीचा सॉफ्ट ग्लॅम मेकअप आकर्षक दिसत होता. ज्यामध्ये न्यूड शेडची गुलाबी लिपस्टिक, डोळ्यांच्या मेकअपसोबत मॅच केली होती. तर, केस अर्धे पिनअप केले होते. ज्यामध्ये कियाराचा फर्स्ट लुक एकदम परफेक्ट दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘वॉर २’मध्ये दिसणार आहे, ज्यात हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर देखील झळकणार आहेत. याशिवाय ती रणवीर सिंहसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘वॉर २’मध्ये दिसणार आहे, ज्यात हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर देखील झळकणार आहेत. याशिवाय ती रणवीर सिंहसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज