बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे कियारा अडवाणी. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कियारा तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती नाही जी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…
कियाराचे खरे नाव आलिया आहे. तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना हे नाव बदलले आहे. कारण त्यावेळी आलिभा भट्ट ही प्रसिद्ध होती.
'अंजाना अंजानी'मधील प्रियांका चोप्राच्या व्यक्तिरेखेचे नाव कियारा होते. तिला वाटले की जर तिला कधी मुलगी झाली तर ती तिचे नाव कियारा ठेवेल. नंतर तिने स्वत:चे नाव कियारा ठेवले.
कियारा ही अंबानी कुटुंबीयांच्या देखील जवळ आहे. कारण ईशा अंबानी ही कियाराची लहानपणापासूनची मैत्रिण आहे.
कियारा अडवाणीच्या बॉलिवूड एन्ट्रीमध्ये सलमान खानचा मोठा वाटा आहे. सलमाननेच तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.