gas explosion in Kenya : केनियाची राजधानी नैरोबी येथे भीषण गॅस स्फोट झाला. या गॅस स्फोटामुळे आग लागून दोघांचा मृत्यू झाला तर २०० हून अधिक नागरिक जखमी झाले.
(1 / 8)
केनियाची राजधानी नैरोबी येथे गॅस ट्रकचा भीषण स्फोट झळा. या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान दोन लोक ठार तर २०० हून अधिक नागरिक जखमी झाले, आहेत. (AP)
(2 / 8)
नैरोबी, केनिया येथील एम्बाकासी परिसरात झालेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर रुग्णवाहिकेच्या पुढे मदतीसाठी रांगेत उभे असताना अधिकारी आणि जखमी नागरिक. (AFP)
(3 / 8)
नैरोबीच्याएम्बाकसी परिसरात, गॅस रिफिलिंग कंपनीत मध्यरात्रीच्या आधी स्फोट झाला. सरकारी प्रवक्ते आयझॅक मवॉरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती देत इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. (AFP)
(4 / 8)
केनियाच्या राजधानीच्या औद्योगिक आणि निवासी भागात स्फोटांनी हादरल्यानंतर केनिया रेड क्रॉसच्या म्हणण्यानुसार, किमान ३० जखमी नागरिकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (AFP)
(5 / 8)
नैरोबी वेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दोन नगरिकांचा मृत्यू झाला. तर २२२ लोक जखमी झाले आहेत.(AFP)
(6 / 8)
केनियाच्या रेड क्रॉसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विविध आपत्कालीन पथकाने नैरोबीमधील रुग्णालयांमध्ये २७१ जखमी नागरिकांना दाखल केले आहे. (AFP)
(7 / 8)
स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या प्रतिमांमध्ये घटनेदरम्यान अनेक घरे आग लागल्याने भस्मसात झाल्याचे म्हटले आहे. (AP)
(8 / 8)
पाठीवर भाजलेला एक जखमी नागरिक नैरोबी येथील म्राडी इस्टेट, एम्बाकासी जिल्ह्यातील तात्पुरत्या गॅस सिलिंडर रिफिलिंग डेपोजवळ उभा असतांना. (REUTERS)