
जपानची बाइक निर्माता कंपनी कावासाकीने आपली नवी केएलएक्स २३० ड्युअल स्पोर्ट मोटारसायकल भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही बाईक ३.३० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत उपलब्ध आहे. केएलएक्स २३० ही ब्रँडची सर्वात लहान रोड- लीगल ड्युअल-स्पोर्ट मोटारसायकल आहे.
कावासाकी केएलएक्स २३० स्लीक आणि मजबूत डिझाइनसह येते. या बाईकमध्ये हेक्सागोनल हेडलाइट्स आणि त्याभोवती प्लॅस्टिकचे काऊल पाहायला मिळत आहे. यात लाँग फ्रंट फेंडर आहे, ज्यामुळे तो ऑफ-रोडर बनतो. यात स्लिम सीट आणि उंचावलेला एक्झॉस्ट आहे. याशिवाय, या बाईकमध्ये डिजिटल एलसीडी डिस्प्ले आणि स्विचेबल ड्युअल चॅनेल एबीएस सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
कावासाकी केएलएक्स २३० मध्ये २३३ सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे, जे १८.१ बीएचपी पॉवर आणि १८.३ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंजिनमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स मिळत आहेत.
कावासाकी केएलएक्स २३० मध्ये उत्तम ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे, ज्यात फ्रंट आणि रियरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यात २१ इंचाच्या फ्रंट आणि १८ इंचाच्या रिअर स्पोक व्हील्सवर रोड-बायस्ड टायर बसवण्यात आले आहेत, जे ऑफ-रोड आणि ऑन-रोड दोन्हीसाठी योग्य आहेत.


