KBC 16:'कौन बनेगा करोडपती'चा १६वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. पण या शोच्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन किती पैसे घेतात? चला जाणून घेऊया...
(1 / 6)
'कौन बनेगा करोडपती' हा शो गेल्या १६ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. आता या शोचा १४वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचे अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. पण एका शोच्या एका एपिसोडसाठी अमिताभ किती पैसे घेतात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया..
(2 / 6)
टीव्हीवर लोकप्रिय ठरलेला हा शो केवळ करोडपती बनण्याची संधी देत नाही तर, अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी देखील मिळवून देतो. लोकांना या शोमधील अमिताभ बच्चन यांची प्रत्येक शैली खूप आवडते.
(3 / 6)
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे २५ लाख रुपये आकारले होते.
(4 / 6)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला सीझन हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांची फी वाढवून एक कोटी रुपये केली.
(5 / 6)
सहाव्या आणि सातव्या सीझनसाठी अमिताभ बच्चन यांनी सुमारे दीड कोटी रुपये आकारले होते.
(6 / 6)
त्यानंतर अशाही बातम्या समोर आल्या की, ८व्या सीझनमध्ये ही फी वाढवून २ कोटी करण्यात आली. यानंतर ९व्या सीझनमध्ये २.६ कोटी, १०व्या सीझनमध्ये ३ कोटी आणि नंतर ११ ते १३व्या सीझनमध्ये ३.५ कोटी इतके मानधन त्यांनी आकारल्याचे बोलले जाते.
(7 / 6)
'कौन बनेगा करोडपती सीझन १६’ हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. या एपिसोडसाठी त्यांनी जवळ ४ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे.