कतरिना आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधली बहुचर्चित जोडी सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. दोघेही एका सिक्रेट लोकेशनवर एकमेकांसोबत वेळ घालवत आहे. (Photo: @katrinakaif/IG)
मात्र, या व्हेकेशन ट्रिपमध्ये कतरिना आणि विकी एकटे नाहीयेत, तर त्यांच्या सोबतीला खास पाहुणे देखील आहेत. विकी आणि कतरिना सध्या एका अभयारण्यात सुट्ट्यांचा वेळ घालवत आहेत. (Photo: @katrinakaif/IG)
या ठिकाणी बिबटे, हरीण आणि इतर वन्य प्राण्यांच्या साथीने ते निसर्गाचा आस्वाद लुटत आहेत. नुकतेच याचे फोटो कतरिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo: @katrinakaif/IG)
कतरिना कैफने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि विकी जंगलात कार्पेट अंथरून बसले आहेत. तर काही फोटोंमध्ये तिने जंगलातील प्राण्यांची झलक दाखवली आहे. (Photo: @katrinakaif/IG)