Most Awaited Indian Movies: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' आणि अजय देवगणचा 'सिंघम अगेन' प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हे दोन्ही चित्रपट १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
(1 / 5)
हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' आणि ॲक्शन ड्रामा चित्रपट 'सिंघम अगेन' दिवाळीत एकत्र चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. या दोन्हींपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे येत्या काही दिवसांतच कळेल, मात्र या दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाबद्दल लोकांना जास्त उत्सुकता आहे, याची माहिती समोर आली आहे.
(2 / 5)
IMDb च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत 'सिंघम अगेन'चे नाव आघाडीवर आहे. जवळपास ४७.५ टक्के लोकांनी चित्रपटात रस दाखवला आहे. तर ३७.४ टक्के लोक 'भूल भुलैया 3' रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.
(3 / 5)
अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट केवळ आयएमडीबीवरच नाही तर बुक माय शोवरही पुढे आहे. 'सिंघम अगेन' चित्रपट पाहण्यासाठी २ लाख ३४ हजार लोक पाट पाहात आहेत. तर 'भूल भुलैया ३' पाहण्यासाठी २ लाख २४ हजार लोकांना रस आहे.
(4 / 5)
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात करीना कपूर खान, अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, रवी किशन, अर्जुन कपूर आणि श्वेता त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत.
(5 / 5)
अनीस बज्मीच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, विजय राज, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि मनीष वाधवा यांच्या भूमिका आहेत.