
कर्नाटक रक्षण वेदिकेने अमूल कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे. नंदिनी कंपनीचे उत्पादन खरेदी करण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.
(HT)अमूल कंपनी कर्नाटकला लुटत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी वेदिकेच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवकुमार यांनी नंदिनी दूध डेयरीला भेट देत लोकांना राज्यातील कंपन्यांमधील उत्पादनच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे.
(HT)कर्नाटक रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन करत अमूल कंपनीचे काही प्रॉडक्ट्स रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकात भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.
(HT)कर्नाटक वेदिकेने अमूल विरोधात केलेल्या आंदोलनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर #SaveNandini द्वारे अमूल कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे.
(twitter/ @amulkannada)

