
Mangaluru Auto Blast Case : कर्नाटकच्या मंगळूरूत ऑटो रिक्षात झालेल्या स्फोटात चालकासह आरोपी शरिक आणि रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
(ANI)Mangaluru Auto Blast Case : मंगळुरूतील ऑटोरिक्षा स्फोटातील आरोपी शारिकच्या कुटुंबीयांनी मंगळूरच्या फादर मुलर हॉस्पिटलमध्ये त्याची भेट घेतली आहे.
(ANI)आरोपी शरीकच्या कुटुंबातील एक पुरुष आणि तीन महिलांनी रुग्णालयात त्याची भेट घेतली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
(ANI)बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक करण्यात आली असून तो आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, आवश्यकता भासल्यास त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंगळुरू शहर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी दिली आहे.
(ANI)

