बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मलायका अरोराने मंगळवारी इन्स्टाग्रामवर करिश्मा कपूर, करिना कपूर, अमृता अरोरासोबत पार्टी करतानाचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने लोलो तू ५० वर्षांची झाली आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे कॅप्शन दिले आहे.
रणधीर कपूर यांची मुलगी आणि करिना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूरने १९९१ मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आज वयाच्या ५०व्या वर्षी देखील ती तितकीच तरुण दिसत आहे
करिश्माच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिचा हा लूक २०२४मधील एका कार्यक्रमातील आहे.
मे २०२४ मध्ये मुंबईत एका फॅशन शोदरम्यान रेड घागरा परिधान करून रॅम्पवॉक करताना करिश्मा कपूर चमकली होती.
करिश्मा कपूर अनेकदा कमीत कमी मेकअपमध्ये सेल्फी काढताना दिसते. तिचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे.