अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतीच 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’ला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात करीनाने एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरकडे दुर्लक्ष केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. (AFP)
करीनाने 'दादासाहेब फाळके पुरस्कार’ पुरस्कारात गोल्डन रंगाचा डिपनेक वनपिस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा देखील 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’ साठी मुंबईत हजर होती. दरम्यान तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. (AFP)
अभिनेत्री राणी मुखर्जीने या पुरस्कार सोहळ्याला काळ्या रंगाची साडी नेसून चाहत्यांचे लक्ष वेधले होते. (AFP)
अभिनेता शाहिद कपूरने देखील काळ्या रंगाचा सूट घातला आहे. या लूकमध्ये तो अतिशय हँडसम दिसत आहे. (AFP)