करीना कपूरने नुकतीच अबुधाबीतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी तिने नेसलेल्या साडीने सर्वांची मने जिंकली. तिच्या लूकवर जवळपास सर्वजण घायाळ झाले आहेत.
करीना अबुधाबीमध्ये ज्वेलरी ब्रँड मलबार गोल्डच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी आली होती. तिने अल वाहदा मॉलमध्ये ज्वेलरी ब्रँडसाठी एक नवीन स्टोअर सुरू केले.
या इवेंटला करीनाने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. तसेच न्यूड मेकअप आणि केसांचा पोनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
करीनाची साडी सर्वांसाठी विशेष आकार्षण ठरली. कारण तिने या फिकट गुलाबी साडीवर मोत्याचे ब्लाऊज घातले आहे.
करीनाने मॉलमध्ये जमलेल्या सर्व चाहत्यांना संबोधित केले. तसेच चाहत्यांनी देखील करीनाचे जल्लोषात स्वागत केले. करीनाने उत्साहाने चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढला.