Karale Master Wardha : राज्यातील कंत्राटी पदभरतीच्या प्रक्रियेला प्रसिद्ध शिक्षक कराळे मास्तर यांनी रस्त्यावर उतरून जोरदार विरोध केला आहे.
(1 / 5)
Karale Master Wardha : राज्यातील पदभरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला वर्ध्यातील प्रसिद्ध शिक्षक नितेश कराळे यांनी जोरदार विरोध केला आहे.(Supriya Sule)
(2 / 5)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश कराळे यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. खासदार सुळे यांनी कराळे मास्तरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.(Supriya Sule)
(3 / 5)
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार पदासाठी काढलेल्या कंत्राटी भरतीवरून उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी तरुणींनी बेरोजगार पकोडेवाल्याचे पोस्टर झळकावत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला आहे.(Supriya Sule)
(4 / 5)
आंदोलक तरुणींनी रस्त्यावर चूल मांडत भजी तळले, याशिवाय वडापावही आंदोलनस्थळी तयार करण्यात आलं. त्यामुळं या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं.(Supriya Sule)
(5 / 5)
शासनाने कंत्राटी भरती रद्द करावी, अशी मागणी आंदोलक नितेश कराळे यांनी केली आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्यात कंत्राटी पदभरतीचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.(Supriya Sule)