सूर्य देव आपल्या कालगणनेनुसार सर्व राशीत भ्रमण करतो. सूर्यदेव जेव्हा सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो दिवस कन्या संक्रांत म्हणून साजरा केला जातो. हा विशेष सण प्रामुख्याने भारतातील पूर्वेकडील राज्ये, पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.
कन्या संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष लाभ होतो. यावर्षी कन्या संक्रांती सोमवार, १६ सप्टेंबर रोजी आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून २ मिनिटांनी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या संक्रांतीची समाप्ती सोमवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी होईल.
सूर्यदेवता पूजा -
कन्या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. सूर्य हा विश्वाचा नियंत्रक आहे असे म्हटले जाते. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने अपार यश मिळते.
पितृ पक्षाचे आगमन-
पितृपक्ष कन्या संक्रांतीच्या दिवसापासून सुरू होतो. पितृ पक्ष सुमारे १६ दिवसांचा असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांना आदर देतात. कन्या संक्रांतीच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध करतात.
विश्वकर्मा पूजा -
कन्या संक्रांतीच्या दिवशी भगवान विश्वकर्माची पूजा केली जाते. विश्वकर्मा हे शिल्प आणि स्थापत्य सृष्टीची देवता असल्याचे म्हटले जाते. या दिवशी लोक त्यांच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची पूजा करतात. वाद्ये आणि उपकरणांमध्ये भगवान विश्वकर्मा वास करतात असे मानले जाते.
दानाचे महत्त्व-
कन्या संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतो. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना दान करू शकता.
कन्या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आणि पितरांची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. कन्या संक्रांतीच्या दिवशी प्रथेनुसार पूजा करावी.
पूजन पद्धत -
प्रथम स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करावी. नंतर एका छोट्या चौरंगावर लाल कापड पसरून त्यावर कलश ठेवा. घागरी गंगाजलाने भरा आणि आंब्याच्या पानांनी दोरा बांधा.
सूर्यदेव पूजा -
सूर्योदयापूर्वी उठून अख्खा तांदूळ(अक्षदा), लाल धागा, चंदन, कुंकू, धूप, फुले इत्यादी एका तांब्यात पाण्यात टाकून घ्या. त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्पण करताना ॐ सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. पूजेच्या शेवटी, सूर्यदेव आणि आपल्या पूर्वजांची आरती करा. सूर्यदेव आणि आपल्या पितरांना फळे आणि मिठाई अर्पण करा.
कन्या संक्रांतीसंबंधी परंपरा:
कन्या संक्रांतीच्या दिवशी अनेक प्रकारच्या लोक परंपरा देखील साजरी केल्या जातात. कन्या संक्रांत पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मीपूजन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी शेतकरी आपल्या पिकांची पूजा करतात.
(HT_PRINT)