तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकारांना चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये अनेकदा स्वयंपाक करताना पाहिलं असेल, पण खऱ्या आयुष्यात कोणत्या अभिनेत्यांकडे स्वयंपाक करण्याचे कौशल्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आपण अशाच काही अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया जे खऱ्या आयुष्यातही अप्रतिम कुक आहेत. त्यातील काहींचा स्वयंपाक संपूर्ण मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे.
मनोज बाजपेयीपासून संजय मिश्रा यांच्यापर्यंत अनेक वेळा मुलाखतींमध्ये तुम्ही स्वयंपाकाविषयीच्या चर्चा ऐकल्या असतील, पण तुम्हाला माहीत आहे का की, कंगना राणौत देखील अप्रतिम जेवण बनवते. स्वत: अभिनेत्रीने मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ती लहान वयातच स्वयंपाक शिकली होती आणि आजही जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा ती स्वतः स्वयंपाक करते.
अभिषेक बच्चन असे मानतो की, स्वयंपाक हा एक प्रकारचा स्ट्रेस बस्टर आहे. याचा अर्थ, जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर स्वयंपाक हा एक मार्ग आहे जो तुम्हाला शांत होण्यास मदत करतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्युनियर बच्चनची चिकन करी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.
अजय देवगण जितका अप्रतिम अभिनेता आहे, तितकाच तो एक अप्रतिम स्वयंपाकी आहे. अजय देवगणचे मुगलाईपासून ते चायनीज आणि उत्तर भारतीय ते बिर्याणीपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभुत्व आहे. अजय कबूल करतो की, स्वयंपाक केल्यावर त्याला खूप आराम वाटतो.
पती अभिषेक बच्चनप्रमाणेच ऐश्वर्या राय बच्चनलाही स्वयंपाकाची आवड आहे. ऐश्वर्या तिच्या कुटुंबासाठी स्वादिष्ट मँगलोरियन पदार्थ बनवते. एकदा तिने आईला मदत करताना स्वयंपाक कसा करायचा हे शिकून घेतले.
अक्षय कुमारचा स्वयंपाक संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कीला स्वयंपाकासोबतच त्याबद्दल सखोल माहिती आहे. त्याला स्वतः स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाला खायला घालायला आवडते. त्याने कधीकाळी शेफ म्हणून कामही केले आहे. हा अभिनेता भारतातील प्रसिद्ध रिॲलिटी शो मास्टर शेफ इंडियामध्ये देखील सामील झाला होता.
दीपिका पदुकोणलाही स्वयंपाकाची आवड आहे. अभिनेत्रीला विविध प्रकारचे पदार्थ बनवायला आवडतात आणि कधीकधी ती सोशल मीडियावर तिने तयार केलेल्या पदार्थांचे फोटो पोस्ट करत असते.