कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नव्या वर्षात चित्रपटगृहांमध्ये बरीच वर्दळ होऊ शकते. पाहा कंगनासोबत आणखी कोणते सिनेमे प्रदर्शित होणार
(1 / 7)
कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नवीन वर्षात थिएटरमध्ये कोणते सिनेमे प्रदर्शित होणार? चला जाणून घेऊया…
(2 / 7)
इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कंगना राणौतला खूप त्रास सहन करावा लागला होता. शेवटी १७ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(3 / 7)
सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा फतेह हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. हा सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट असल्याचा सोनूचा दावा आहे.
(4 / 7)
1971 च्या युद्धावर आधारित इक्कीस या चित्रपटाची रिलीज डेट देखील 10 जानेवारी 2025 आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत धर्मेंद्रही दिसणार आहे.
(5 / 7)
अक्षय कुमारचा स्काय फोर्स हा चित्रपट २५ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. हा चित्रपट 1965 मध्ये झालेल्या खतरनाक पाकिस्तानी हवाई हल्ल्यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
(6 / 7)
सनी देओल आणि आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट लाहोर 1947 ची रिलीज डेट देखील 26 जानेवारी 2025 असल्याचे सांगितले जाते.
(7 / 7)
वेलकम टू द जंगल 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होत आहे