Kangana Ranaut at Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी आता कंगना रनौत देखील शाही अंदाजात तयार झाली आहे.
(1 / 5)
अवघा देश आज आपल्या प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत देखील अयोध्येत पोहोचली आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी आता कंगना रनौत देखील शाही अंदाजात तयार झाली आहे.
(2 / 5)
नुकतेच कंगना रनौत हिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये कंगना रनौत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी तयार झाल्याचे दिसत आहे. सुंदर साडी नेसून पारंपारिक अवतारात कंगना या सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये कंगना रानौत हिने सुंदर मोती रंगाची साडी नेसली आहे. तर, तिच्या या साडीवर लाल रंगाचे नक्षीकाम करण्यात आले आहे. यासोबत कंगनाने मॅचिंग लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले होते. या ब्लाऊजवर सोनेरी नक्षीकाम करण्यात आले आले.
(4 / 5)
या साडीसोबत कंगनाने लाल रंगाची शाल घेतली आहे. या लूकमध्ये कंगना रनौत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या रॉयल लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
(5 / 5)
गळ्यात भरजरी चोकर नेकलेस, केसांची सुंदरशी हेअरस्टाईल, हलका मेकअप या लूकमध्ये कंगना रनौत शाही घराण्यातील राजकुमारी वाटत आहे.