'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. त्याला या पहिल्यावहिल्या मालिकेने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. पण त्यानंतर ऋषी मराठी मालिकांमध्ये दिसला नाही. आता तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत होती. आता तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.
ऋषी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.