(3 / 4)दुसरीकडे, गायिकेच्या मृत्यूनंतर तिच्या एजन्सी XANADU एंटरटेनमेंटने शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी कोरियामध्ये तिच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. निवेदनात असे लिहिले आहे की, 'पार्क बो राम ११ एप्रिल रोजी संध्याकाळी अचानक आपल्याला सोडून गेली. तिच्या चाहत्यांना ही दुःखद बातमी कळवताना आमची ह्रदयेही पिळवटून निघत आहेत. गायिकेच्या अंत्यसंस्काराची माहिती तिच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर दिली जाईल.