
अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमावस्या असंही म्हटलं जातं. यंदा जेष्ठ अमावस्या १८ जून २०२३ रोजी येत आहे, या दिवशी स्नानआणि दानाला विशेष महत्व देण्यात आलं आहे. असं केल्याने पितरं सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते
(Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)
जेष्ठ अमावस्या तिथी आणि शुभ वेळ: जेष्ठ कृष्ण अमावस्या तिथी १७ जून, शनिवारी, सकाळी ०९.११ वाजता सुरू होईल आणि १८ जून, रविवारी, सकाळी १०.०६ वाजता समाप्त होईल. १८ जून रोजी सकाळी ०७.०० वाजता स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त सकाळी ०९.०० ते दुपारी १२.३८ पर्यंत असेल.
जेष्ठ अमावस्येसाठी ज्योतिषीय उपाय: या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितृदेवतेची प्रार्थना करावी. जर तुम्ही नदीवर जाऊ शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा आणि नैवेद्य दाखवा.
या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. गरजूंना दिल्याने सत्कर्माचे फळ मिळते आणि पितृ प्रसन्न होतात. त्यामुळे अनेक ग्रहांचे अडथळे दूर होतात.
या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.
जेष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.




