PHOTOS : वडिलांनंतर मुलानंही रचला विक्रम; धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : वडिलांनंतर मुलानंही रचला विक्रम; धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!

PHOTOS : वडिलांनंतर मुलानंही रचला विक्रम; धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!

PHOTOS : वडिलांनंतर मुलानंही रचला विक्रम; धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!

Published Nov 09, 2022 11:49 AM IST
  • twitter
  • twitter
  • New CJI Of India : न्या. धनंजय चंद्रचूड यांनी अनेक ऐतिहासिक आणि वादग्रस्त खटल्यांमध्ये धाडसी निकाल दिलेले आहेत. आज त्यांनी देशाच्या ५० व्या सरन्यायाधीशपदाची आज शपथ घेतली आहे.
New CJI Dhananjay Chandrachud : मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
twitterfacebook
share
(1 / 6)
New CJI Dhananjay Chandrachud : मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.(PTI)
New CJI Dhananjay Chandrachud : काही दिवसांपूर्वीच सीजेआय उदय लळित यांनी यांनी सरन्यायाधीशपदासाठी न्या. चंद्रचूड यांची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. केंद्रानं त्यांच्या नावाला संमती दिल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
twitterfacebook
share
(2 / 6)
New CJI Dhananjay Chandrachud : काही दिवसांपूर्वीच सीजेआय उदय लळित यांनी यांनी सरन्यायाधीशपदासाठी न्या. चंद्रचूड यांची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. केंद्रानं त्यांच्या नावाला संमती दिल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. (PTI)
न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सात वर्ष चार महिने इतका मोठा काळ देशाचं सरन्यायाधीशपद भूषवलं आहे. त्यानंतर आता त्यांचे पूत्र धनंजय चंद्रचूड यांनी आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. असा विक्रम करणारे चंद्रचूड एकमेव सरन्यायाधीश ठरले.
twitterfacebook
share
(3 / 6)
न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सात वर्ष चार महिने इतका मोठा काळ देशाचं सरन्यायाधीशपद भूषवलं आहे. त्यानंतर आता त्यांचे पूत्र धनंजय चंद्रचूड यांनी आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. असा विक्रम करणारे चंद्रचूड एकमेव सरन्यायाधीश ठरले.(PTI)
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते विदेशात गेले. अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून त्यांनी एलएलबी आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.
twitterfacebook
share
(4 / 6)
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते विदेशात गेले. अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून त्यांनी एलएलबी आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.(PTI)
धनंजय चंद्रचूड यांची सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशपदाची कारकिर्द अत्यंत कार्यक्षम आणि धाडसी राहिलेली आहे. त्यांनी बाबरी मशीद प्रकरणातील निवाड्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय कलम ३७७, आधार कार्डच्या वैधतेबाबातचा निकाल, महिलांना व्याभिचाराचं स्वातंत्र्य, शबरीमाला मंदिरातील वाद आणि नौदलात महिलांचा समावेश इ. खटल्यांत ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत.
twitterfacebook
share
(5 / 6)
धनंजय चंद्रचूड यांची सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशपदाची कारकिर्द अत्यंत कार्यक्षम आणि धाडसी राहिलेली आहे. त्यांनी बाबरी मशीद प्रकरणातील निवाड्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय कलम ३७७, आधार कार्डच्या वैधतेबाबातचा निकाल, महिलांना व्याभिचाराचं स्वातंत्र्य, शबरीमाला मंदिरातील वाद आणि नौदलात महिलांचा समावेश इ. खटल्यांत ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत. (PTI)
आता नवनिर्वाचित सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना दोन वर्षांहून अधिकचा कार्यकाळ मिळणार आहे. आगामी काळात त्यांच्यासमोर सीएए-एनआरसी आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीसह अन्य काही महत्त्वांच्या प्रकरणांमध्ये निवाडा करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि बहुतांश राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका त्यांच्याच काळात होणार असल्यानं त्यांच्या नियुक्तीला कायदेशीर तसेच राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)
आता नवनिर्वाचित सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना दोन वर्षांहून अधिकचा कार्यकाळ मिळणार आहे. आगामी काळात त्यांच्यासमोर सीएए-एनआरसी आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीसह अन्य काही महत्त्वांच्या प्रकरणांमध्ये निवाडा करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि बहुतांश राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका त्यांच्याच काळात होणार असल्यानं त्यांच्या नियुक्तीला कायदेशीर तसेच राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.(PTI)
इतर गॅलरीज