बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वी आमिरने मुलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आमिरने द रपिल शर्मा शोमध्ये म्हटले होते की 'माझी मुले माझं काहीच ऐकत नाहीत.' आता यावर आमिरचा लेक जुनैद खानने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
'आमचे बाबा नेहमीच आम्ही जसे आहोत तसे राहण्याचे स्वतंत्र्य देतात. हो.. आणि त्यासाठी ते नेहमीच आमचे कौतुक करतात. जर तुम्ही त्यांना कधीही एखाद्या गोष्टीबद्दल विचारले तर ते कधीच हे करु नकोस किंवा हे का करतोय असा प्रश्न नाही विचारत. ते नेहमी सांगतात की हे बघ मला असे असे वाटत आहे पण तुला जे हवे ते तू कर' असे जुनैद म्हणाला.
जुनैदच्या कामाविषयी बोलायचे झाले तर नुकताच 'महाराजा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.