भूल भुलैया ३ हा हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि घाबरवेल. पण जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही चित्रपटांची यादी आणली आहे नक्की पाहा…
गंगनम जॉम्बी हा 2023 साली प्रदर्शित झालेला दक्षिण कोरियन ॲक्शन हॉरर चित्रपट आहे. जर तुम्हाला झोम्बी चित्रपट पाहणे आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहू शकता.
रूम 203 ही एक अमेरिकन हॉरर फिल्म आहे जी तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. हा चित्रपट दोन रूममेट्सची कथा आहे. किम आणि इझी एका अपार्टमेंटच्या रुम 203 मध्ये जातात. तिथे त्यांना काही विचित्र गोष्टी जाणवतात.
मुंबई 125 किमी थ्रीडी हा चित्रपट 2014 साली आला होता. या चित्रपटात चार मित्रांची कहाणी आहे जे एका रोडट्रीपला निघाले होते. ते एका महिलेला भेटतात आणि त्यानंतर सर्व मित्र एक एक करून मरायला लागतात. तुम्ही जिओ सिनेमावर चित्रपट पाहू शकता.
कृष्णा कॉटेज 2004 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात सोहेल खान आणि अनिता हसनंदानी दिसले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. हा चित्रपट तुम्ही Jio सिनेमावर मोफत पाहू शकता.