
तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल, तर Jio AirFiber च्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्यासाठी उत्तम योजना आहेत. अशाच काही उत्तम प्लान्सबद्दल आपण जाणून घेऊया. या पोस्टपेड प्लान्समध्ये तुम्हाला 1000GB डेटा, 300Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड आणि अनेक OTT ॲप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल.
जिओच्या ८८८ रुपयांच्या प्लानमध्ये 30Mbps स्पीड आणि 1000 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix आणि प्राइम व्हिडिओसह एकूण १४ ओटीटी ॲप्स मोफत पाहता येतात.
जिओ एयरफायबरचा ८९९ रुपयांचा हा प्लान 100Mbps स्पीड आणि 1000 GB डेटा सह येतो. या प्लानमध्ये, Disney + Hotstar आणि Sony Liv सह एकूण १२ OTT ॲप्सचा मोफत अॅक्सेस मिळतो.
जिओचा ११९९ रुपयांचा हा प्लान 100Mbps इंटरनेट स्पीड देतो. यात एकूण 1000 GB डेटा मिळेल. ही योजना Netflix आणि प्राइम व्हिडिओसह एकूण १५ OTT ॲप्सचा विनामूल्य अॅक्सेस देते.


