रिलायन्स जिओने सध्या देशातल्या ४ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा बुधवार, ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सुरू करण्यात येत आहे. आणि त्या निमित्ताने कंपनीने Jio 5G वेलकम ऑफर देखील लाँच केली आहे.
(HT_PRINT)या ऑफरमध्ये वापरकर्त्यांना 1gbps+ स्पीडने अमर्यादित 5G डेटा मिळेल. तथापि,याची सध्या, Jio 5G बीटा चाचणी करण्यात येत आहे. त्यात जिओच्या वापरकर्त्यांना ५जी वापरताना आलेले अनुभव ग्राह्य धरले जातील. त्याच्याच आधारावर जिओ नंतर आपली ५जी सेवा सर्वसामान्यांना खुली करणार आहे.
(Bloomberg)जिओने सध्या कोणत्याही 5G प्लॅनची घोषणा केलेली नाही. याचा अर्थ, जिओच्या स्वागत ऑफरमध्ये 5G समाविष्ट असेल तरच Jio वापरकर्त्यांना विनामूल्य 5G नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल.
(Bloomberg)यापूर्वीही जिओने २०१७ मध्ये ४जी साठी पण अधिकृत योजना जाहीर होण्यापूर्वी, ग्राहकांना मोफत 4G प्रवेश दिला होता. आपल्या ग्राहकांना येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांच्या आधारावरच जिओ आपली पुढची योजना ठरवत असते. ५जी च्या टेस्टिंगच्या निमित्तानेही जिओची हीच योजना पुन्हा एकदा समोर आली आहे.
(REUTERS)