Jennifer Lopez: दोन वर्षही टिकला नाही संसार; हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज!-jennifer lopez has filed for divorce from ben affleck after 2 years of marriage ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jennifer Lopez: दोन वर्षही टिकला नाही संसार; हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज!

Jennifer Lopez: दोन वर्षही टिकला नाही संसार; हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज!

Aug 21, 2024 12:43 PM IST
  • twitter
  • twitter
Jennifer Lopez Divorce: हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ हिने अखेर तिचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ हिने अखेर तिचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पती बेन ऍफ्लेकपासून वेगळे होण्यासाठी अभिनेत्रीने एलए काउंटी सुपीरियर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोघांच्या विभक्त होण्याची तारीख २६ एप्रिल २०२४ असल्याचे सांगण्यात आले आहे. जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक त्यांच्या घटस्फोटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते.
share
(1 / 5)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही मागील काही काळापासून वेगळे राहत होते. अनेकवेळा जेनिफर एकटीच ट्रॅव्हलिंग टूरवर जातानाही दिसली होती. यानंतर अभिनेत्रीच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता ५५ वर्षीय जेनिफरने २१ वर्षीय बेनपासून अधिकृतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफर लोपेझने विवाह समुपदेशनाची मदत घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याशिवाय बेन ऍफ्लेकला मदत देण्यास नकार देण्याची विनंती न्यायाधीशांना करण्यात आली आहे.
share
(2 / 5)

घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघे सार्वजनिक ठिकाणी क्वचितच एकत्र दिसले होते. आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत आणि त्यांना एकमेकांना भेटण्याचीही इच्छा नाही. जेनिफर आणि बेनच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे खरे कारण काय आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये लग्नाआधी दोघांमध्ये काही करार झाला होता की, नाही याचाही उल्लेख नाही.
share
(3 / 5)

जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांचे २०२२मध्ये लग्न झाले होते. दोघांनी एकाच वर्षात दोनदा लग्न केले होते. जेनिफर आणि बेन यांनी जुलै २०२२मध्ये लास वेगासमध्ये पहिल्यांदा लग्न केले होते. यानंतर दोघांनी ऑगस्ट २०२२मध्ये पुन्हा लग्न केले. दोघांनी जॉर्जियामध्ये दुसऱ्यांदा लग्न केले. जेनिफर आणि बेनची जोडी हॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. मात्र, दोघांचे लग्न दोन वर्षेही टिकू शकले नाही आणि आता ते घटस्फोट घेणार आहेत.
share
(4 / 5)

दोघांनी एकत्र दोन चित्रपट केले आहेत. २००३मध्ये, जेनिफर आणि बेन मार्टिन ब्रेस्टच्या लोकप्रिय रोमँटिक चित्रपट 'गिगली'मध्ये दिसले होते. यानंतर २००४मध्ये ते केविन स्मिथच्या 'जर्सी' या कॉमेडी चित्रपटात दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विश्वास ठेवला तर या काळात दोघांनीही एकमेकांना डेट केले होते.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज