(2 / 5)इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला कोपराला दुखापत झाली होती. २०२१ मध्ये अहमदाबादमध्ये भारताविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने ससेक्ससाठी काही सामने खेळले परंतु दुखापती गंभीर होत चालल्याने त्याला पुन्हा मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो २०२१ च्या टी२० विश्वचषक आणि २०२१ च्या ऍशेसमध्ये सहभागी होऊ शकला नाही. आर्चरने दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली. १९ मे २०२२ रोजी त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते.