मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs PAK : जसप्रीत बुमराहची क्रिकेटवाली लव्हस्टोरी, संजना गणेसनसोबत अशी झाली पहिली भेट, पाहा

IND vs PAK : जसप्रीत बुमराहची क्रिकेटवाली लव्हस्टोरी, संजना गणेसनसोबत अशी झाली पहिली भेट, पाहा

Jun 10, 2024 08:42 PM IST
  • twitter
  • twitter
  • jasprit bumrah love story : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सामन्यात बुमराहने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराहच्या गोलंदाजीमुळेच भारताने ११९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी बचाव केला.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत असतोच, पण तो त्याच्या लव्हस्टोरीमुळेही प्रचंड चर्चेत असतो. त्याची पत्नी संजना गणेसन ही टीव्ही प्रेझेंटर आहे.
share
(1 / 8)

जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तर संजना ही क्रिकेटमध्ये प्रेझेंटर म्हणून येण्यापूर्वी संजना गणेशनचे आयुष्य पूर्णपणे वेगळे होते. संजना एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.
share
(2 / 8)

२०१२ मध्ये, संजना गणेशनने फेमिना मिस इंडिया स्टाइल दिवा स्पर्धेत भाग घेतला आणि फायनल गाठली. येथूनच तिचे करिअर सुरू झाले. 
share
(3 / 8)

६ मे १९९१ रोजी जन्मलेल्या संजना गणेशन ही प्रसिद्ध क्रीडा निवेदिका आहेत. ती मॉडेलिंगही करायची. ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रेझेंटर म्हणून काम करताना दिसते.
share
(4 / 8)

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. या मुलखातीनंतरच दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही.
share
(5 / 8)

संजना आणि जसप्रीतची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. या दोघांनीही बरेच दिवस त्यांचे नाते मीडियापासून दूर ठेवले होते. २०२१ मध्ये, जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती. त्यानंतर दोघांच्या लग्नानंतर दोघांनीही एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
share
(6 / 8)

लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात एका खाजगी समारंभात लग्न केले. या लग्नात शीख परंपरांचे पालन करण्यात आले.
share
(7 / 8)

जसप्रीत बुमराह आशिया चषक २०२३ दरम्यान ब्रेक घेऊन आपल्या घरी परतला होता. त्यावेळी जसप्रीत आणि संजनाच्या घरी नवीन पाहुणा आला होता. ४ सप्टेंबर २०२३ रोजी जसप्रीत एका मुलाचा पिता झाला. त्याने आपल्या मुलाचे नाव अंगद जसप्रीत बुमराह ठेवले आहे.
share
(8 / 8)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज