Japan earthquakes : जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला; ६२ ठार, घरे कोसळली, रस्त्यांना पडल्या भेगा, पाहा फोटो-japan powerful earthquakes leave at least 62 dead ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Japan earthquakes : जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला; ६२ ठार, घरे कोसळली, रस्त्यांना पडल्या भेगा, पाहा फोटो

Japan earthquakes : जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला; ६२ ठार, घरे कोसळली, रस्त्यांना पडल्या भेगा, पाहा फोटो

Japan earthquakes : जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला; ६२ ठार, घरे कोसळली, रस्त्यांना पडल्या भेगा, पाहा फोटो

Jan 04, 2024 09:10 AM IST
  • twitter
  • twitter
  • Japan earthquakes : पश्चिम जपानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहे. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढीगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात नागरीक अडकले असल्याची शक्यता असून बचाव कार्य सुरू आहे.
पश्चिम जपानला धडकलेल्या शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांचा आकडा वाढता आहे. आता पर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहेत. बुधवारी झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती  कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 
share
(1 / 8)
पश्चिम जपानला धडकलेल्या शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांचा आकडा वाढता आहे. आता पर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहेत. बुधवारी झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती  कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. (AP)
सुझू, इशिकावा प्रीफेक्चर, जपानमध्ये बुधवारी भूकंपामुळे अग्निशमन दल आणि पोलीस किनारी भागात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत.   
share
(2 / 8)
सुझू, इशिकावा प्रीफेक्चर, जपानमध्ये बुधवारी भूकंपामुळे अग्निशमन दल आणि पोलीस किनारी भागात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत.   (AP)
पश्चिम जपानमधील शक्तिशाली भूकंपामुळे अनेक लोकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानांनी शॉक व्यक्त केला आहे. तसेच बचाव कार्य वेगाने राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यात गोठवणारी थंडी आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आल्याने ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे.  बचाव पथकाने एका श्वनाच्या मदतीने  ढिगाऱ्याखली अडकलेल्या एका व्यक्तीला  बाहेर काढले. 
share
(3 / 8)
पश्चिम जपानमधील शक्तिशाली भूकंपामुळे अनेक लोकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानांनी शॉक व्यक्त केला आहे. तसेच बचाव कार्य वेगाने राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यात गोठवणारी थंडी आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आल्याने ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे.  बचाव पथकाने एका श्वनाच्या मदतीने  ढिगाऱ्याखली अडकलेल्या एका व्यक्तीला  बाहेर काढले. (AP)
सोमवारच्या प्राणघातक भूकंपानंतर बुधवारी टोकियोच्या वायव्येस जपानच्या समुद्राकडे तोंड करून नोटो द्वीपकल्पातील सुझू येथील तात्पुरत्या निर्वासन केंद्रात वैद्यकीय कर्मचारी नागरिकांवर उपचार करत आहेत. 
share
(4 / 8)
सोमवारच्या प्राणघातक भूकंपानंतर बुधवारी टोकियोच्या वायव्येस जपानच्या समुद्राकडे तोंड करून नोटो द्वीपकल्पातील सुझू येथील तात्पुरत्या निर्वासन केंद्रात वैद्यकीय कर्मचारी नागरिकांवर उपचार करत आहेत. (AP)
इशिकावा प्रीफेक्चर आणि आजूबाजूच्या भागात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर दोन दिवसांनी देखील भूकंपाचे धक्के बसने सुरूच आहे. आतापर्यंत ९० हून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरले आहे. या आपत्तींनंतर जीव वाचवण्यासाठी पहिले ७२ तास महत्त्वाचे मानले जातात. 
share
(5 / 8)
इशिकावा प्रीफेक्चर आणि आजूबाजूच्या भागात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर दोन दिवसांनी देखील भूकंपाचे धक्के बसने सुरूच आहे. आतापर्यंत ९० हून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरले आहे. या आपत्तींनंतर जीव वाचवण्यासाठी पहिले ७२ तास महत्त्वाचे मानले जातात. (AP)
“भूकंप होऊन ४०  तासांहून अधिक काळ लोटला आहे. हा काळाविरुद्धचा लढा आहे. मला वाटते की आपण एका नाजूक क्षणाला समोर जात आहोत, असे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पत्रकारांना सांगितले. अजून बरेच लोक  इमारतींखाली मदतीसाठी  वाट पाहत आहेत. बचाव कार्य वेगाने राबविले जात आहे. 
share
(6 / 8)
“भूकंप होऊन ४०  तासांहून अधिक काळ लोटला आहे. हा काळाविरुद्धचा लढा आहे. मला वाटते की आपण एका नाजूक क्षणाला समोर जात आहोत, असे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पत्रकारांना सांगितले. अजून बरेच लोक  इमारतींखाली मदतीसाठी  वाट पाहत आहेत. बचाव कार्य वेगाने राबविले जात आहे. (REUTERS)
सुझू मधील तात्पुरत्या निर्वासन केंद्रात हीटरभोवती विसावा घेत असतांना नागरीक. तर त्यांना  पाणी, ब्लँकेट, अन्न आणि इतर साहित्य देणारे अधिकारी 
share
(7 / 8)
सुझू मधील तात्पुरत्या निर्वासन केंद्रात हीटरभोवती विसावा घेत असतांना नागरीक. तर त्यांना  पाणी, ब्लँकेट, अन्न आणि इतर साहित्य देणारे अधिकारी (AP)
काही भागात पाणी, वीज आणि सेल फोन सेवा अजूनही बंद आहे.  अनामिझू, जपानजवळ भूकंपानंतर रस्त्याला मोठी भेग पडली असून त्यात अडकलेली कार 
share
(8 / 8)
काही भागात पाणी, वीज आणि सेल फोन सेवा अजूनही बंद आहे.  अनामिझू, जपानजवळ भूकंपानंतर रस्त्याला मोठी भेग पडली असून त्यात अडकलेली कार (REUTERS)
इतर गॅलरीज