जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून त्यांनी भेटीची सुरुवात केली.
(RajkRaj/ Hindustan Times)जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय चर्चा केली.
(RajkRaj/ Hindustan Times)हैदराबाद हाऊस, दिल्ली येथे पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्याशी संवाद साधत असतांना.
(RajkRaj/ Hindustan Times)जपानचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करत त्यांनी दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्याचा निश्चय केला.
(RajkRaj/ Hindustan Times)जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा पंतप्रधान मोदींसोबत भारतीय मेजवणीचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी पाणी पुरीवर देखील ताव मारला.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे जपानचे पंतप्रधान समकक्ष फुमियो किशिदा दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये फेरफटका मारत जागतिक आणि दोन्ही देशातील विविध मुद्यांवर चर्चा केली.