जपानमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या रविवारी १०० वर पोहोचली आहे, तर २०० हून अधिक नागरीक बेपत्ता आहेत. गेल्या आठ वर्षांतील जपान मधील हा सर्वात शक्तिशाली आणि प्राणघातक भूकंप आहे. जपानच्या पश्चिम किनार्यावर ७.६ तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला, होकुरिकू प्रदेशात २३ हजार घरे या भूकंपामुळे कोसळली.
(AFP)मध्य जपानमध्ये झालेल्या प्रचंड भूकंपानंतर पाच दिवसांनी वाचलेल्यांना शोधण्याऐवजी मृतदेह बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहेत. या घटनेत आता १०० लोक ठार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
(AFP)कोसळलेल्या इमारतींखाली वाचलेल्यांचा शोध घेतला जात आहे. भूकंप होऊन ६ दिवस झाले आहे. आतापर्यंत ३० नागरिकांना मदत देण्यात आली आहे.
(AP)शनिवारी बचाव मोहिमेच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दैनंदिन बैठकीत अॅनामिझू शहरात दोन आणखी नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे.
(AFP)वाजिमा, इशिकावा प्रीफेक्चर, जपानमधील एका मार्केटला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवल्यावर अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्य राबवित असतांना. शक्तिशाली भूकंपांच्या मालिकेमुळे वाजिमा शहरात मोठी आग लागली. तसेच या प्रदेशात त्सुनामी आणि भूस्खलनाची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.
(AP)काही तासांत, वाजिमामध्ये मृतांची संख्या १० ने वाढली, ज्यामुळे मृत नागरिकांचा आकडा ११० वर पोहोचला.
(AP)वाजिमा शहरात सर्वाधिक ६९ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, त्यानंतर सुझूचा क्रमांक लागतो. या ठिकाणी २३ नागरीक ठार झाले आहेत. भूकंपामुळे ५०० हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान २७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
(AP)जपानमधील मोठ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पत्र लिहिले आणि मृतांच्या शोकग्रस्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला.
(REUTERS)