Patriotic Movies : जानेवारी महिना ठरणार देशभक्तीचा! नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात रिलीज होणार 'हे' चित्रपट
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Patriotic Movies : जानेवारी महिना ठरणार देशभक्तीचा! नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात रिलीज होणार 'हे' चित्रपट

Patriotic Movies : जानेवारी महिना ठरणार देशभक्तीचा! नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात रिलीज होणार 'हे' चित्रपट

Patriotic Movies : जानेवारी महिना ठरणार देशभक्तीचा! नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात रिलीज होणार 'हे' चित्रपट

Dec 21, 2024 12:39 PM IST
  • twitter
  • twitter
Patriotic Movie : येत्या वर्षाचा पहिला महिना देशभक्तीपर चित्रपटांचा असणार आहे. जानेवारी २०२५मध्ये काही धमाकेदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तुम्ही खूप दिवसांपासून अशा चित्रपटाची वाट पाहत असाल तर ही यादी पहा...
तुम्हाला पीरियड ड्रामा किंवा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची आवड असेल, तर जानेवारी २०२५ तुमच्यासाठी असणार आहे. या महिन्यात असे ५ चित्रपट प्रदर्शित होत आहेत ज्यांची प्रेरणा ऐतिहासिक घटनांमधून घेण्यात आली आहे. यातील बहुतांश चित्रपट युद्धपट आहेत. जर, तुम्ही २६ जानेवारीच्या आसपास चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

'इक्किस ' हा युद्धपट आहे. हा चित्रपट १९७१च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार केला गेला आहे आणि सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

अजय देवगण, अमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत 'आझाद' हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. यात एका कुटुंबाची आणि त्यांच्या विश्वासू घोड्याची कथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट महाराणा प्रताप आणि त्यांचा घोडा चेतक यांच्या कथेवरून प्रेरित असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटाची कंगनाच्या चित्रपटाशी टक्कर आहे. सध्या रिलीजची तारीख १७ जानेवारी ठरवण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

'स्काय फोर्स' या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमार आहे. ही कथा १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. यामध्ये भारताने केलेला धोकादायक हवाई हल्ला दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

'लाहोर' या चित्रपटात आमिर खान आणि सनी देओल मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल देखील असणार आहे. हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

सोनू सूदचा 'फतेह' हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित आहे. यांची कथा सायबर क्राईमवर आधारित आहे. १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज