Janhvi Kapoor: जान्हवी कपूर बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही धुमाकूळ घालणार! पाहा आगामी चित्रपटांची संपूर्ण यादी…-janhvi kapoor will make a splash in south industry along with bollywood check out the complete list of upcoming movies ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Janhvi Kapoor: जान्हवी कपूर बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही धुमाकूळ घालणार! पाहा आगामी चित्रपटांची संपूर्ण यादी…

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही धुमाकूळ घालणार! पाहा आगामी चित्रपटांची संपूर्ण यादी…

Sep 14, 2024 04:18 PM IST
  • twitter
  • twitter
Janhvi Kapoor Upcoming Movies: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूरही साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. चला तर, एक नजर टाकूया जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांवर...
जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर जान्हवी सतत यशस्वीपणे पुढे जात आहे. वेगवेगळ्या चित्रपटांतून जान्हवीने स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडनंतर ती साऊथ इंडस्ट्रीतही पदार्पण करणार आहे. आज आम्ही तुम्हाला जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. २०२४ आणि २०२५मध्ये प्रदर्शित होणाऱ्या जान्हवीच्या सिनेमांबद्दल जाणून घेऊया…
share
(1 / 7)

जान्हवी कपूर साऊथच्या 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत ज्युनियर एनटीआर दिसणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
share
(2 / 7)

जान्हवी कपूरकडे आणखी एक मोठा चित्रपट आहे. ती सुपरस्टार राम चरणसोबत 'आरसी १६'मध्ये दिसणार आहे. बुची बाबू याचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २६ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
share
(3 / 7)

‘नानी ३३’ हा श्रीकांत ओडेला दिग्दर्शित एक तेलुगू ॲक्शन एंटरटेनर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता नानी आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
share
(4 / 7)

जान्हवी कपूर पुन्हा एकदा वरुण धवनसोबत झळकणार आहे. हे दोन्ही स्टार्स 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
share
(5 / 7)

जान्हवी साऊथचा सुपरस्टार सूर्यासोबत 'कर्ण' चित्रपटात दिसणार होती. रिपोर्टनुसार, ३५० कोटींचा हा चित्रपट डबाबंद झाला आहे. याशिवाय 'तख्त' हा आणखी एक चित्रपटही तिच्या हातातून गेला आहे. हा चित्रपट बनण्यापूर्वीच बंद झाला होता.
share
(6 / 7)

यावर्षी जान्हवीचे 'उलझ' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' सिल्व्हर स्क्रीनवर रिलीज झाले आहेत.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज