बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ६ मार्च रोजी तिचा २७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने आपला एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. २७ वर्षांची जान्हवी कपूर साडी नेसून खूपच सुंदर दिसत होती.
गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली जान्हवी कपूर या लूकमध्ये एकदम क्यूट दिसत होती. ‘बर्थडे गर्ल’ जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच प्रभावित करताना दिसली.
वाढदिवसानिमित्ताने जान्हवी कपूर हिने तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन देव दर्शन घेतले. जान्हवी ही सुंदर साऊथ स्टाईल साडी परिधान करून मंदिरात गेली होती.
जान्हवी कपूर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही माझ्यावर भरभरून केलेल्या प्रेमाच्या वर्षावाबद्दल धन्यवाद.’
जान्हवी 'देवरा' या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या टीमने जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. याशिवाय, मेगास्टार राम चरण आणि दिग्दर्शक बुची बाबू यांच्या आगामी चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीमने नुकतीच याची अधिकृत घोषणा केली आहे.