(1 / 7)बॉलिवूडमध्ये दिवाळीचा सण सुरू झाला आहे. पुढील आठवड्यात दिवाळी असली, तरी लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सिनेकलाकार ग्लॅमरस लूक दाखवतान दिसले होते. बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट पिंक लेहंगामध्ये अधिक सुंदर दिसत होती. आलियाने पुन्हा एकदा तिचा जुना लेहेंगा परिधान करून आपला जलवा दाखवला.