West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो-jalpaiguri storm west bengal death toll rises to 5 cm mamata banerjee meets families of victims ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो

West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो

West Bengal Storm : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा! ५ ठार, हजारो नागरिक बेघर; पाहा फोटो

Apr 01, 2024 12:28 PM IST
  • twitter
  • twitter
West Bengal Storm: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी भागात चक्रीवादळ आलं आहे, या चक्रीवादळात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे.  
रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने एका महिलेसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि तर सुमारे ५०० हूनअधिक जण जखमी झाले.
share
(1 / 8)
रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने एका महिलेसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि तर सुमारे ५०० हूनअधिक जण जखमी झाले.(ANI)
उत्तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे, या वादळामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यात येत आहे.  
share
(2 / 8)
उत्तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे, या वादळामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यात येत आहे.  (ANI)
गारांसह जोरदार वाऱ्यामुळे अनेक झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली, आणि रविवारी जिल्हा मुख्यालय शहर आणि शेजारच्या मैनागुरीच्या अनेक भागात विजेचे खांब कोसळले. 
share
(3 / 8)
गारांसह जोरदार वाऱ्यामुळे अनेक झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली, आणि रविवारी जिल्हा मुख्यालय शहर आणि शेजारच्या मैनागुरीच्या अनेक भागात विजेचे खांब कोसळले. (PTI)
वादळ दुपारी ३.३० च्या सुमारास काही चौरस किलोमीटर पसरलेल्या गावांना धडकले आणि सुमारे १० मिनिटे या वादळाचा मोठा प्रभाव होता.  
share
(4 / 8)
वादळ दुपारी ३.३० च्या सुमारास काही चौरस किलोमीटर पसरलेल्या गावांना धडकले आणि सुमारे १० मिनिटे या वादळाचा मोठा प्रभाव होता.  (PTI)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी रात्री उशिरा वादळामुळे बाधित झालेल्या गावांना भेट दिली. तसेच  लोकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
share
(5 / 8)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी रात्री उशिरा वादळामुळे बाधित झालेल्या गावांना भेट दिली. तसेच  लोकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
या वादळामुळे पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून जखमींची संख्या मोठी आहे. मी जखमींची आणि वादळात मृत्यूमुखी  पावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राज्य प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले. 
share
(6 / 8)

भरपाई देण्याबाबत विचारले असता, बॅनर्जी म्हणाल्या, आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मी याबद्दल घोषणा करू शकत नाही मात्र, स्थानिक प्रशासन या बाबत योग्य सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
share
(7 / 8)
भरपाई देण्याबाबत विचारले असता, बॅनर्जी म्हणाल्या, आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मी याबद्दल घोषणा करू शकत नाही मात्र, स्थानिक प्रशासन या बाबत योग्य सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
"ही आपत्ती आहे, आणीबाणीची परिस्थिती आहे. मी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना आणि रूग्णालयात उपचार घेत असलेल्यांचीही भेट घेतली आहे. बचाव कार्यात तातडीने कारवाई केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानते.   लोकांच्या बाजूने आणि त्यांच्या उपचाराची आणि घरांच्या पुनर्बांधणीची काळजी घेतली घेईल, असे देखील  बॅनर्जी म्हणाल्या. 
share
(8 / 8)

इतर गॅलरीज