पौर्णिमा तिथी हिंदू धर्मात खूप खास मानली जाते. हा दिवस अत्यंत पवित्र आहे, या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. वर्शभरातून १२ पौर्णिमा साजरी केली जाते आणि त्यातील प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे महत्व आहे.
ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा आणि वट सावित्री पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गंगेत स्नान केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान करणे खूप फायदेशीर ठरते. पांढरे कपडे, साखर, तांदूळ, दही किंवा चांदी दान करू शकता. असे मानले जाते की यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.
(Freepik)तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला काही झाडांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धीची शक्यता निर्माण होते. त्याबद्दल जाणून घेऊया.
ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमेची तारीख आणि वेळ:
यावर्षी उदया तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा २१ जून २०२४ रोजी साजरी केली जाईल. ही तारीख २१ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि २२ जून २०२४ रोजी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे.
पिंपळाची पूजा :
पिंपळ या वृक्षाची पूजा केल्याने लोकांना अनेक लाभ मिळतात. या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ या वृक्षाची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. यावेळी झाडाखाली दिवा लावून आरती करावी. यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असतो असेही सांगितले जाते.
वटवृक्ष पूजा :
हिंदू धर्मात वटवृक्षाची पूजा अतिशय फलदायी आहे. मान्यतेनुसार यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व असते, म्हणून पूजा करणे हा या तीन देवतांचा आशीर्वाद मिळण्याचे भाग्य आहे. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो. यामुळे लग्नातील अडथळेही दूर होतात. वटवृक्षाची प्रदक्षिणा केल्याने लोकांना मनःशांती मिळते, असे मानले जाते.
तुळशीची पूजा :
ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला तुळशीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी तुळशीची पूजा केल्यास आर्थिक संबंधित समस्या दूर होते. असे मानले जाते की तुळशीची पूजा केल्याने मानवी कुंडलीतील दोष दूर होतात आणि सौभाग्य वाढते. याशिवाय आध्यात्मिक शांती, समृद्धी आणि आरोग्यही सुधारते. म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला तुळशीची पूजा करा.
(Unsplash)