(3 / 6)महाप्रसाद – पुरीतील जगन्नाथ मंदिराचा महाप्रसाद दररोज शेकडो लोक खातात. पण ज्या पद्धतीने हा स्वयंपाक केला जातो ती पूर्णपणे आश्चर्य करणारी बाब आहे. असे म्हटले जाते की, हे स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे. असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी ७ भांडी एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे. भाविकांची संख्या कितीही असली तरी मंदिरात कोणताही भक्त उपाशी राहत नाही.